"ऍट्रोसिटी'च्या प्रकरणातून डॉ. लहाने यांची मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची "ऍट्रोसिटी'च्या प्रकरणातून सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयातील नरेश वाघेला नावाच्या सफाई कामगाराला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

हा गुन्हा 2014 मध्ये दाखल झाला होता. याप्रकरणी डॉ. लहाने यांनी मुंबई सत्र न्यायालयातून 15 हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. मुंबईच्या माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांकडे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले होते. यादरम्यान त्यांना जे. जे. परिसरात येण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती. आरोपपत्रात एकूण 14 साक्षीदारांच्या जबाबांची नोंद केली होती. मात्र, डॉ. लहाने यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा पुढे आले नाही. आपल्याविरोधात हे षड्‌यंत्र असल्याचा दावा डॉ. लहाने यांनी केला होता.

Web Title: mumbai news dr. tatyarao lahane release