मुंबईत दोघांचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - सांताक्रुझ आणि मलबार हिल-प्रियदर्शनी पार्कजवळ वेगवेगळ्या घटनांत रविवारी (ता. 11) दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. फईम अहमद कलीम शेख (वय 15) आणि जयेश पेडणेकर (16) असे मृताचे नाव आहे. 

मुंबई - सांताक्रुझ आणि मलबार हिल-प्रियदर्शनी पार्कजवळ वेगवेगळ्या घटनांत रविवारी (ता. 11) दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. फईम अहमद कलीम शेख (वय 15) आणि जयेश पेडणेकर (16) असे मृताचे नाव आहे. 

फईम हा उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये राहतो. उन्हाळी सुटीत तो धारावी येथे मामाकडे आला होता. सकाळी तो चार मित्रांसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता. प्रियदर्शनी पार्कजवळ समुद्रात हे चौघे पोहायला गेले होते. भरती असल्याने फईमला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो लाटेबरोबर पाण्यात खेचला गेला आणि बुडू लागला. हे पाहताच त्याचे मित्र किनाऱ्यावर आले. काही स्थानिकांनी फईम बुडत असल्याचे पाहिले. याबाबत तटरक्षक दलाला माहिती मिळताच जवानांनी त्याचा शोध घेतला. दोन स्थानिक तरुणांनी फईमला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. मलबार हिल पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. 

दरम्यान, जुहू जेट्टीजवळ पोहण्याकरता गेलेल्या 16 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. जयेश हा सांताक्रुझच्या गझरबंध परिसरात राहतो. सायंकाळी तो मित्रासोबत जहू जेट्टी येथील समुद्रात पोहण्याकरता गेला होता. तो बुडत असल्याचे एकाने पाहिले. त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी जयेशला मृत घोषित केले. जयेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. 

Web Title: mumbai news drowned