मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई, ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेला बसला. विक्रोळी-घाटकोपर परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे धिम्या गतीने सुरू आहे.

मुंबई - मुंबई शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस होत असून, यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. विक्रोळी परिसरात पाणी साचल्याने मध्य रेल्वेवरील गाड्या एक तास उशिराने धावत आहेत.

मुंबई, ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेला बसला. विक्रोळी-घाटकोपर परिसरात रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीला अर्धा ते एक तास उशिराने सुरू आहे.

रविवार आणि ईदच्या सुट्टीनंतर कार्यालयाकडे निघालेल्या नोकरदारांना मोठा फटका बसत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​

Web Title: Mumbai news Due to heavy rains, Central Railway delay