एटीएम हॅक करून 20 लाखांवर डल्ला 

अनिश पाटील
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - एटीएम यंत्राला आयपॉडसारखे यंत्र जोडून चोरांनी 20 लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्‍कादायक प्रकार मुंबई सेंट्रल येथे उघडकीस आला. या प्रकाराने पोलिसही चक्रावले आहेत. "इलेक्‍ट्रॉनिक प्रेमेंट अँड सर्व्हिस'चे सुपरवायझर निखिल शेट्ट्ये यांच्या तक्रारीनुसार नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीतील चित्रणाच्या मदतीने चोरांचा शोध सुरू आहे. 

ही चोरी 11 फेब्रुवारीला झाल्याचे स्पष्ट झाले. एटीएमच्या हार्डडिस्क आणि सॉफ्टवेअर तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर मार्ग परिसरातील कॉर्पोरेशन बॅंकेच्या एटीएममध्ये ही चोरी झाली असून, चोरी करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर असावेत, असा पोलिसांना संशय आहे. एटीएममध्ये त्या वेळी 35 लाख रुपये होते. त्यातील 20 लाख 80 हजारांवर चोरट्यांनी डल्ला मारला, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बसवत यांनी दिली. 

अशाप्रकारची ही मुंबईतील पहिली चोरी असून, त्यासाठी "मालवेअर' नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. सीसीटीव्हीच्या पाहणीत दोन तरुणांनी ही चोरी केल्याचे दिसत आहे. आरोपींनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडावर रुमाल बांधला होता. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींना एटीएमच्या सॉफ्टवेअरची माहिती असल्यानेच त्यांनी आयपॉडसारखे यंत्र जोडले. त्यातील "मनी डिस्पेन्सर सिस्टिम'मध्ये ऍप्लिकेशनच्या साहाय्याने "मालवेअर' टाकून एटीएम यंत्रामधून दोन हजारांच्या एक हजार 40 नोटा चोरांनी काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: mumbai news Dump 20 million by hacking ATMs