ई-मेल हॅक करून 13 लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई - ई-मेल हॅक करून अनिवासी भारतीयाच्या बॅंक खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंपास केलेली रक्कम दोन वेगवेगळ्या खात्यांत जमा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पंकज शहा असे या अनिवासी भारतीयाचे नाव आहे. ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत.

शहा आणि पत्नीच्या नावाचे एका खासगी बॅंकेत संयुक्त खाते आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते पैसे काढण्यासाठी गेले, त्या वेळी खात्यात केवळ 650 रुपये शिल्लक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अधिक माहिती घेतली असता, 21 जानेवारीला सात लाख, 23 जानेवारीला पाच लाख 50 हजार आणि 27 जानेवारीला 50 हजार एवढी रक्कम आरटीजीएस व एनएएफटीच्या साह्याने दुसऱ्या खात्यांमध्ये वळती करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी त्यांनी अधिक माहिती घेतली असता, त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून बॅंकेकडे ई-मेल आला होता. त्यात त्यांचा अधिकृत ई-मेल बदलण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याच्या साह्याने आरोपींनी शहा यांच्या खात्यातून नेट बॅंकिंगच्या साह्याने ही रक्कम काढल्याचा संशय आहे. ही रक्कम दोन खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: mumbai news e mail hack cheating crime