"ईडी' कार्यालयात शाहरूखची अनुपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - "फेमा' कायद्याचा भंग केल्याबाबत ईडीच्या नोटिशीनंतर बुधवारी अभिनेता शाहरूख व गौरी खान यांचे वकील अंतिम सुनावणीसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात उपस्थित होते. ही माहिती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

मुंबई - "फेमा' कायद्याचा भंग केल्याबाबत ईडीच्या नोटिशीनंतर बुधवारी अभिनेता शाहरूख व गौरी खान यांचे वकील अंतिम सुनावणीसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात उपस्थित होते. ही माहिती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

"फेमा' कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने शाहरूखला नोटीस पाठवून 23 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर शाहरूखने पत्र पाठवून चार आठवडे मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. शाहरूख खानच्या मालकीची "रेड चिली' ही कंपनी आहे. या कंपनीचे शेअर 2008-09 मध्ये अभिनेत्री जुही चावला हिचे पती जय मेहता यांच्या "सी आयलॅण्ड इन्व्हेस्टमेंट्‌स' या मॉरिशसमधील कंपनीला विकले होते. ते विकताना त्यांची किंमत आठ ते नऊ पट कमी करण्यात आली होती. 2011 मध्ये "ईडी'ने शाहरूखवर 73 कोटी सहा लाख रुपयांच्या व्यवहारात परकीय चलन नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवला आहे. 

"रेड चिली'ची 2008 मध्ये स्थापना झाली तेव्हा "केआरएसपीएल'चे 9900 शेअर "रेड चिली'कडे होते. गेल्या वर्षी "ईडी'च्या मूल्यांकन अहवालात काही आक्षेप नोंदविले होते. त्यानुसार "सी आयलॅण्ड इन्व्हेस्टमेंट'ला "केआरएसपीएल'चे शेअर देण्यात आले, तेव्हा प्रत्येक शेअरची किंमत 75 रुपये असणे आवश्‍यक होती; मात्र ते प्रत्येकी 10 रुपयांप्रमाणे विकले. या प्रकरणी जुलैमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. त्याला उत्तर देताना शाहरूखने 22 ऑगस्टला पत्र पाठवून चार आठवडे मुदत वाढवून देण्याची विनंती केली. त्यानुसार त्याचे वकील बुधवारी ईडी कार्यालयात आले होते. या वेळी शाहरूख व त्याची पत्नी गौरी उपस्थित नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: mumbai news ED Shah Rukh Khan