हॉंगकॉंगमधील यंत्रणांना ईडी पत्र पाठवणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे केलेल्या हजारो कोटींच्या आयात गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) हॉंगकॉंगमधील यंत्रणेला लवकरच लेटर ऑफ रेगोरेटरी (एलआर) पाठवणार आहे. या गैरव्यवहारातील 518 कोटी हॉंगकॉंगमधील बोगस कंपनीला पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी ईडीने गेल्या सोमवारी (ता. 23) रघुकुल डायमंड कंपनीचे माजी संचालक संजय जैन यांना अटक केली होती. विजय कोठारी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या गैरव्यवहारातून हजारो कोटींची रक्कम परदेशात पाठवण्यात आली आहे. ईडीच्या तपासानुसार, कोठारी हा हवाला गैरव्यवहारातही सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो दुबई आणि हॉंगहॉंगमधून हिरे आयात करीत असे. याबाबतची माहिती घेण्यासाठी ईडी लवकरच एलआर पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोठारीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. सध्या तो दुबईत असल्याचा ईडीचा संशय आहे. कोठारीला 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही तो हजर न राहिल्यास न्यायालय त्याला फरारी घोषित करू शकते. त्यानंतर त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे काम सुरू होईल. त्याने 518 कोटी रुपये हॉंगहॉंगच्या बोगस कंपनीला पाठवले आहेत.

Web Title: mumbai news edi letter to hong system