हसनअली प्रकरणी मुंबईत "ईडी'चे छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - पुण्यातील व्यावसायिक हसन अलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी मुंबईत चार ठिकाणी छापे टाकले. या गुन्ह्यांशी संबंधित काही हवाला ऑपरेटरच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कट रचणे व भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने जुलैमध्ये नवीन गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर 4 व 5 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश हसन अलीला दिले होते. त्या वेळी हसन अलीने प्रकृती ठीक नसल्याचे सांगत चौकशीसाठी नंतर बोलावण्याची विनंती केली होती.

अलीविरोधात भादंवि कलम 120 (ब), 420 व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988- 13(1), 13(2)ड व सीआरपीसी 41(1)(बी) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही; तरी या प्रकरणी प्राप्तिकर विभागाचे काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, हसन अली याच्या कोणत्याही मालमत्तेवर छापा टाकण्यात आलेला नाही, असे त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: mumbai news edi raid in hasanali case