शिक्षण विभागावर टीकेची झोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - राज्याच्या शिक्षण विभागाने 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय मागे घेत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केले; मात्र दिवसभर शिक्षण विभागावर टीकेची झोड सुरूच होती. चुकीचे निर्णय मागे घ्यावेच लागतात; परंतु व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्‍यक सूचनांकडे लक्ष देण्यास शिक्षण विभागाला वेळ नसल्याने विरोध वाढत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दिली. एरव्ही 15 एप्रिलनंतर शाळांना उन्हाळी सुटी जाहीर होते; मात्र 15 एप्रिल ते 5 मेपर्यंत या कालावधीत शिक्षक शाळेत हजर राहत असल्याने विद्यार्थ्यांची खोटी हजेरी लावली जाते. याबाबत आपण पाच वर्षांपूर्वीच शिक्षण विभागाकडे आक्षेप नोंदवला होता, असेही कुलकर्णी म्हणाले.
Web Title: mumbai news education department comment