वीजनिर्मितीत 1 हजार मेगावॉटने वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - महानिर्मितीच्या कोळसा पुरवठ्यात मोठी वाढ झाल्याने वीजनिर्मितीही तब्बल 1 हजार मेगावॉटने वाढ झाली. त्यामुळे भारनियमाला सामोरे जाणाऱ्या राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. 

मुंबई - महानिर्मितीच्या कोळसा पुरवठ्यात मोठी वाढ झाल्याने वीजनिर्मितीही तब्बल 1 हजार मेगावॉटने वाढ झाली. त्यामुळे भारनियमाला सामोरे जाणाऱ्या राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. 

महानिर्मितीला काही महिन्यांपासून दररोज 18 ते 20 रेल्वे रेक्‍स कोळसा पुरवठा करण्यात येत होता. दहा दिवसांमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 25 रेल्वे रेक्‍स इतकी झाली आहे. त्याचरोबर ट्रकद्वारे दररोज 10 ते 12 हजार टन कोळसा महानिर्मितीला मिळत आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या वीजनिर्मितीत वाढ झाली आहे. सध्या महानिर्मितीद्वारे राज्याला 5500 ते 5800 मेगावॉट वीज महानिर्मिती मिळत आहे. कोळशाचा पुरवठा वाढल्याने महानिर्मितीच्या चंद्रपूर, परळी, पारस, नाशिक, खापरखेडा येथील 8 संचाद्वारे वीजनिर्मिती होत आहे. 

कोळसा पुरवठ्यात वाढ झाल्याने केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वीज केंद्रात कोळशाचा 21 दिवसांचा साठा ठेवणे शक्‍य होईल, असे महानिर्मितीचे म्हणणे आहे. महानिर्मितीच्या संचांच्या ठिकाणी सध्या सरासरी 7 ते 8 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे.

Web Title: mumbai news electricity

टॅग्स