वीज कंपनी कार्यालयाला टाळे लावण्याचे आंदोलन

वीज कंपनी कार्यालयाला टाळे लावण्याचे आंदोलन

मुंबई - वीजजोडणी तोडण्याची कारवाई करणाऱ्या वीज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून स्वत: जोडणी जोडून देण्याचे आंदोलन बुधवारपासून (1 नोव्हेंबर) सुरू केले जाईल, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे राज्य समन्वयक व किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला. वीज कंपनीची पठाणी वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी सुकाणू समितीने केली आहे.

कर्जमाफीची चाललेली फसवणूक व सरकारी धोरणांमुळे सातत्याने पडणारे शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना, वीज वितरण कंपनीने बीजबिलाची पठाणी वसुली सुरू केली असल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी केली. याच्या निषेधार्थच राज्यभरात उद्यापासून वीज कंपनी कार्यालयाला टाळे लावण्याचे आंदोलन कले जाणार असल्याची माहिती यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com