ही चेंगराचेंगरी मानवनिर्मित आपत्ती- सोनिया गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सरकार, बुलेट ट्रेनबद्दल गप्पा मारत आहे, मात्र मूलभूत सुविधाच येथे नाहीत, असे सांगत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर टीका केली. 

मुंबई - ही मानवनिर्मित आपत्ती आहे, असे सांगत रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "योग्य नियोजन आणि व्यवस्था असती तर हा अपघात टाळता आला असता. 

एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच, जखमींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 
दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या घटनेतील पीडितांना मदत करावी असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले आहे. 

रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि राज्यातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची माहिती घेतली. एल्फिस्टन स्टेशनवर आज (शुक्रवार) चेंगराचेंगरीत किमान 22 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 37 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

सरकार, बुलेट ट्रेनबद्दल गप्पा मारत आहे, मात्र मूलभूत सुविधाच येथे नाहीत, असे सांगत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर टीका केली. 

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी एल्फिन्सटनच्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत नातेवाईकांना गमावलेल्या पीडित कुटुंबांबाबत पूर्ण सहानुभूती व्यक्त करत जखमींनी लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 

एल्फिन्सटन रोड आणि परळ उपनगर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलावर ही चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेतील पीडितांना मदतकार्य करण्यासाठी आवश्यक विभाग, संस्थांना तातडीने आदेश देण्यात आल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. 
 

Web Title: mumbai news elphinstone stampede manmade sonia gandhi