'ढिसाळ कारभाराचा फटका'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन येथील रेल्वे पुलाच्या बांधकामाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती; मात्र रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्याचे "टेंडर' निघाले नाही, अशी माहिती प्रभू यांचे स्वीय सहायक हरीश प्रभू यांनी येथे दिली. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 23 एप्रिल 2015 रोजी एल्फिन्स्टन येथे 12 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब इतक्‍या आकाराचा पूल मंजूर केला होता. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भातला पत्रव्यवहार सुरेश प्रभू यांच्याशी केला होता. पादचाऱ्यांसाठीच्या समस्या लक्षात घेऊन या रेल्वे पुलाचा आकार वाढवण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी शेवाळे यांनी केली होती. त्यानंतर या कामाला रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी देत 11.86 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, त्यानंतर रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाला खुद्द त्यांच्याच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हरताळ फासला, असा आरोप सुरेश प्रभू यांच्या स्वीय सहायकांनी केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news elphinstone station bridge stampede