एल्फिन्स्टन स्थानकात "स्वच्छ दिवाळी' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

या उपक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर रेल्वेस्थानकापासून ते सेनापती बापट मार्गदरम्यानचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला

वडाळा - दिवाळीचे औचित्य साधून एल्फिन्स्टन येथील इंडिया बुल्स हाऊसिंगच्या वतीने एल्फिन्स्टन रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी (ता. 14) "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत "स्वच्छ दिवाळी 2017' हा उपक्रम राबविण्यात आला. यात 250 हून अधिक मुंबईतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर रेल्वेस्थानकापासून ते सेनापती बापट मार्गदरम्यानचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

इंडिया बुल्स हाऊसिंगच्या वतीने शनिवारी 55 शहरांतील 110 शाखांमधील तब्बल पाच हजार कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी "स्वच्छ दिवाळी 2017' हा उपक्रम राबवला असल्याची माहिती इंडिया बुल्स हाऊसिंगचे महासंचालक अर्चना हुड्डा यांनी दिली.

Web Title: mumbai news: elphinstone station diwali