एल्फिन्स्टनचा नवा जिना सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - एल्फिन्स्टन रोड रेल्वेस्थानकातील दुर्घटना घडलेल्या पादचारी पुलावरील दादरच्या दिशेने उतरणाऱ्या जिन्याला समांतर बांधलेला जिना नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. १) रहदारीसाठी खुला करण्यात आला. आता जुन्या जिन्यावर पडणारा प्रवाशांचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील जुन्या अरुंद पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. ३९ हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. दुर्घटना घडलेल्या पुलाचा दादरच्या दिशेने उतरणारा जिना अरुंद असल्याने तेथेच अनेक प्रवासी अडकून पडले होते. दुर्घटनेनंतर पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने जिन्याला समांतर नवीन जिन्याचे बांधकाम तात्काळ हाती घेतले. एल्फिन्स्टन रोडला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा जुना जिना २.१ मीटरचा असून, नवा जिना २.५ मीटरचा बांधण्यात आला आहे. नवीन जिन्याच्या बांधकामासाठी जुन्या जिन्याला लागून असलेले जुने तिकीटघरही हटवण्यात आले आहे. या जिन्याच्या बांधकामासाठी १७ लाख रुपये खर्च आला असून अवघ्या ६० दिवसांत याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: mumbai news elphinstons new bridge start