'पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

दहिसर - पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केले पाहिजे, असे मत नगरसेवक जगदीश ओझा यांनी व्यक्त केले.

दहिसर - पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केले पाहिजे, असे मत नगरसेवक जगदीश ओझा यांनी व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिका आर/उत्तर विभागातर्फे शून्य कचरा मोहिमेअंतर्गत भरवलेल्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना नगरसेवक जगदीश ओझा यांनी प्लास्टिकविरोधात लढा देण्यासाठी ‘सकाळ’ने हाती घेतलेल्या प्लास्टिकविरोधी उपक्रमाचे स्वागत केले. त्यासाठी आजपासून प्रत्येकाने प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही अशी शपथ घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे काळजी घेतो त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने हे शहर आपले समजून पुढाकार घेतल्यास पालिकेची शून्य कचरा मोहीम यशस्वी होईल, असा आत्मविश्‍वास पालिकेच्या स्वच्छ मुंबई अभियानाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी व्यक्त केला. प्रदर्शनाचे उद्‌घाटन पालिका उपायुक्त अशोक खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, मनीषा चौधरी, नगरसेवक जगदीश ओझा, हरिश छेडा, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर उपस्थित होते. प्रदर्शनात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यापासून खतनिर्मिती यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सप्टेंबर ११ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत समाज कल्याण केंद्र, विद्यामंदिर शाळेजवळ, छत्रपती शिवाजी मार्ग, दहिसर (पूर्व) येथे भरवण्यात आले आहे.

Web Title: mumbai news environment Jagdish Ojha