फुटलेला पेपर पाहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

अडीच वर्षे परीक्षेपासून दूर राहावे लागणार
मुंबई - व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झालेल्या प्रश्‍नपत्रिकेने यंदा मुंबई विभागीय मंडळाची डोकेदुखी वाढवली. तब्बल चार प्रश्‍नपत्रिका मुंबईतूनच व्हॉट्‌सऍपवर फुटल्याने मंडळाने तपासणीत सापडलेल्या सहा विद्यार्थ्यांना अडीच वर्षे परीक्षा देण्यास बंदी घातली.

मुंबई विभागीय मंडळाने आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत "बुककीपिंग'च्या परीक्षेच्या वेळी गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, पश्‍चिम उपनगरांतील दोन परीक्षा केंद्रांतील तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकेची प्रतिमा आढळली. या विद्यार्थ्यांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या; मात्र या विद्यार्थ्यांना इतर विषयांची परीक्षा देण्याची मुभा मंडळाने दिली होती. याव्यतिरिक्त वाशी येथील परीक्षा केंद्रात तपासणी करताना तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकेची प्रतिमा सापडली. त्यांच्या चौकशीकरता समितीही स्थापन करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी या समितीने आपला अहवाल मुंबई विभागीय मंडळाला दिला. या अहवालाविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

Web Title: mumbai news examination of students who saw the fragmented paper