तरुणीचे फेसबुक खाते हॅक करून अश्‍लील संदेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई -  तरुणीचे फेसबुक खाते हॅक करून तिच्या मित्र-मैत्रिणींना अश्‍लील छायाचित्र व संदेश पाठवल्याचा प्रकार गोरेगाव येथे घडला आहे. आरोपीने तरुणीला लग्नास नकार दिल्यानंतर तिचे दुसरीकडे लग्न ठरले होते. त्याचा राग मनात धरून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

28 वर्षीय आरोपी तरुणाने तक्रारदार तरुणीला लग्नास नकार दिला. त्यानंतर या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न जुळले. याची माहिती आरोपीला मिळाल्यानंतर तो संतापला व त्याने तिचे फेसबुक खातेच हॅक केले. त्यानंतर फेसबुक खात्याचा पासवर्ड बदलला व तिच्या मित्र-मैत्रिणींना अश्‍लिल संदेश व छायाचित्र पाठवण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या तरुणीने गोरेगाव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाविरोधात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: mumbai news facebook crime