बनावट व्हिसाप्रकरणी आणखी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - बनावट कागदपत्राद्वारे व्हिसा बनवणाऱ्या दोघांना बुधवारी (ता. 28) साकीनाका पोलिसांनी अटक केली. सुनील मेहरा आणि सुधीर शुक्‍ला अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून नऊ व्हिसा पोलिसांनी जप्त केले. न्यायालयाने दोघांना शुक्रवार (ता. 30)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

शहरात बनावट कागदपत्राद्वारे व्हिसा आणि पासपोर्ट बनवण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र परदेशातील विमानतळावर तपासणीनंतर अशा व्यक्तींना भारतात परत पाठवले जाते. बनावट पासपोर्टप्रकरणी दलालांवर पोलिस कारवाई करतात. 15 दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी एका विश्रामगृहावर छापा घालून सूरज बहादूर श्रेष्ठा आणि विजयकुमार शांताराम प्रधान यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 25 पासपोर्ट, लॅपटॉप, प्रिंटर जप्त करण्यात आले. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी हरियाणा, चंडीगड, पंजाब, दिल्ली, गोवा येथील नागरिकांचे व्हिसा तयार केले होते. ते व्हिसाही पोलिसांनी जप्त केले. दोघांच्या चौकशीत सुनील आणि सुधीरचे नाव पुढे आले. सुनील दिल्लीचा; तर सुधीर गुजरातचा रहिवासी आहे. पोलिसांनी सुधीरला नवी मुंबईतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सात बनावट पासपोर्ट मिळाले. सुधीरला नवी दिल्लीतून अटक झाली. त्याच्याकडे दोन पासपोर्ट सापडले. चीनच्या दूतावासाच्या नावाचा गैरवापर करून हे दोघे दोन वर्षांपासून बनावट कागदपत्राद्वारे व्हिसा तयार करायचे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai news fake visa crime