मुंबईकरांपुढे आजही 'दूधबाणी' कायम

संदीप  खांडगेपाटील
मंगळवार, 6 जून 2017

बळीराजाने पुकारलेल्या संपाच्या सहाव्या दिवशी दूध पुरवठा जेमतेम झाल्याचे मुंबईकरांना दुधाची तहान आता दूधाच्या पावडरवर क्षमवावी लागली आहे.

मुंबई : राज्यात बळीराजाने पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे भाज्यासाठी हाल होऊ नये यासाठी परराज्यातील बळीराजाने भाज्या विक्रीला पाठविल्या आहेत. तथापि ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून संपामुळे दुधाचा पुरवठा होत नसल्याने मुंबईकरांपुढे आजही खर्‍या अर्थांने दूधबाणीची परिस्थिती कायम आहे. दररोज 80 लाख लिटर दूधाची तहान असणार्‍या मुंबईकरांना जेमतेम आज 8 लाख 40 लिटर दुधाचा पुरवठा झाला आहे.

बळीराजाने पुकारलेल्या संपाच्या सहाव्या दिवशी दूध पुरवठा जेमतेम झाल्याचे मुंबईकरांना दुधाची तहान आता दुधाच्या पावडरवर क्षमवावी लागली आहे. 80 लाख लिटर दुधामध्ये 8 लाख लिटर गोकुळचे दूध, वारणाचे 2 लाख लिटर दूध, प्रभातचे 60 हजार लिटर दूध, महानंदाचे अडीच लाख लिटर दूध, सोनईचे 50 हजार लिटर दूध, राजहंसचे 50 हजार लिटर दूध, गोदावरीचे 30 लाख लिटर, स्वराजचे 35 हजार लिटर, मदर डेअरी 2 लाख 20 हजार लिटर दूधाचा समावेश आहे.

मंगळवारी मुंबईकरांना गोकुळचे साडे तीन लाख लिटर दूध, वारणाचे 2 लाख लिटर दूध, महानंदाचे दीड लाख लिटर दूध, मदर डेअरीचे 1 लाख 40 हजार लिटर दूध उपलब्ध झाले आहे. मुंबई शहर, उपनगर आणि अन्य सभोवतालच्या भागात मोठ्या प्रमाणावर दूध उपलब्ध झाले नाही. दुकानातील शिल्लक दूधाचाही साठा संपल्याने आता मॉल व किराणा मालाच्या दुकानामध्ये दूध पावडरची विक्री जोरदार होवू लागली आहे.

Web Title: mumbai news farmers strike milk crisis