मुंबई बाजारात भाज्यांची आवक घटली

संदीप  खांडगेपाटील
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई : मंगळवारी सकाळी मुंबई  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी भाज्यांच्या आवकमध्ये घट झाली आहे. विक्रीसाठी  आलेल्या  भाज्यांमध्ये टोमॅटो व कोबीचे प्रमाण अधिक असल्याने कोबी व टोमॅटोचे दर घसरले आहेत. अन्य भाज्यांच्या दरांमध्ये चढउतार कायम आहे. कांदा व बटाटाही मंगळवारी विक्रीला आला असला तरी सोमवारच्या तुलनेत कांदा बटाटाची आवक कमीच राहीली.

बाजार समितीमध्ये विक्रीला आलेल्या भाज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा बाहेरील राज्यातून आलेल्या भाज्यांचे प्रमाण अधिक आहे. सकाळी भाजी मार्केटमध्ये 353  ट्रक आणि टेम्पो भरून भाज्या विक्रीला आल्या आहेत.यामध्ये 76 ट्रक  आणि 277 टेम्पोचा समावेश आहे.काल बाजारात 146 ट्रक आणि  404  टेम्पो असा 550 वाहनातून भाज्या  विक्रीला  आल्या होत्या. आज  बाजारात 44 ट्रक कांदा  आणि 45 ट्रक  भरून बटाटा विक्रीला आला  आहे.

काल 64 ट्रक   बटाटा व 61 ट्रक कांदा विक्रीला आला होता.काल 20 ते 30  रूपये किलोची कोबी आज 18 ते 20 रूपये, काल वाटाणा 60 ते 70 रूपये तर आज 70 ते 75 रूपये, काल भेंडी 20 ते 30 रूपये तर आज 30 ते 32 रूपये, सिमला काल 30 ते 40 तर आज 40 ते 50 रूपये, शेवगा काल 35 ते 45 तर आज 30 ते 32 रूपये, टोमॅटो काल 30 ते 40 रूपये तर आज 14 ते 15 रूपये,  काकडी काल 10 ते 20 रूपये तर आज 10 ते 15 रूपये, गाजर काल 30 ते 40 रूपये तर आज 20 ते 24 रूपये, गाजर काल 30 ते 40 रूपये तर आज 20 ते 24 रूपये,मिरची काल 30 ते 40 रूपये तर आज 40 ते 50 रूपये किलो या दराने विकली गेली.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर काल 100 जुडी 50 ते 60 रूपये या दराने विकली गेली. परराज्यातील भाज्याचे रोखीच्या स्वरूपात व्यापार्‍यांकडून पैसे दिले जावू लागल्याने तेथील शेतकर्‍यांचा या मार्केटकडे भाज्या पाठविण्याचा ओघ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: mumbai news farmers strike vegetables intake