नालासोपाऱ्यात कुटुंबाला विष पाजून पित्याची आत्महत्या
मनीष बहाद्दूर सिंग (वय 30), पिंकी मनीष बहाद्दूरसिंग (वय 25), प्रगती (वय 7) आणि प्रतीक्षा (वय 3) असे यांची नावे आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यात मनीष बहाद्दूर सिंग आणि 7 वर्षांची प्रगतीचा मृत्यू झाला आहे. तर पिंकी आणि 3 वर्षांची प्रतीक्षा या दोघी मायलेकीची प्रकृती चिंताजनक आहे.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात पित्याने 2 मुलांसह पत्नीला विष पाजून स्वत:ही विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष बहाद्दूर सिंग (वय 30), पिंकी मनीष बहाद्दूरसिंग (वय 25), प्रगती (वय 7) आणि प्रतीक्षा (वय 3) असे यांची नावे आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यात मनीष बहाद्दूर सिंग आणि 7 वर्षांची प्रगतीचा मृत्यू झाला आहे. तर पिंकी आणि 3 वर्षांची प्रतीक्षा या दोघी मायलेकीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बँकेच्या कर्जाला कंठाळून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तुलिंज पोलिस अधिक तपास करीत आहेत.