मेट्रोच्या स्थानकासाठी मिठी नदीत भराव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

मुंबई - मुंबईतील नद्या प्रदूषणामुळे अखेरचा श्‍वास घेत असतानाच मेट्रो प्रकल्पासाठी मिठी नदीत भराव घातल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. हा प्रकार जाणूनबुजून होत असून पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप पर्यावरण कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी केला आहे. भाथेना यांनी रविवारी धारावी येथील मेट्रो स्थानकाला भेट दिली. त्यावेळी हा प्रकार त्यांना दिसला. हा भाग कांदळवनाचा असून सागरी किनारा संरक्षण कायदा कलम-1 नुसार संरक्षित आहे. तरीही मेट्रो प्रकल्पातील कचरा उचलून थेट मिठी नदीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. तब्बल 10 मीटर आत खोल शिरून मिठी नदीत बांधकाम करण्यासाठी माती, खडक टाकून भराव टाकण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे, असे भाथेना यांनी म्हटले आहे.
Web Title: mumbai news filler in mithi river for metro stop