आगीमध्ये सोळा गोदामे खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

भिवंडी - तालुक्‍यातील ओवळी गावातील सागर कॉम्प्लेक्‍समधील ‘चेक पॉईंट’ या कागद व फर्निचरचा साठा असलेल्या कंपनीला सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनीबरोबरच १६ गोदामे खाक झाली. या गोदामांमधील कागद, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आदी लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. गोदामांमध्ये आग विझविण्यासाठी प्रतिबंधक साहित्य नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना सुमारे सात तासांची झुंज द्यावी लागली.

धनराज दासवानी यांच्या मालकीच्या कंपनीतील रासायनिक द्रव्याच्या साठ्याला आग लागली. रासायनिक द्रव्यांमुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आग लगतच्या इंटरव्हेट इंडिया या कंपनीच्या औषधे साठविलेल्या गोदामात पसरली. त्यानंतर परिसरातील १६ गोदामे खाक झाली.

Web Title: mumbai news fire bhiwandi godown