अग्निसुरक्षेसाठी चित्तथरारक प्रात्यक्षिके

अग्निसुरक्षेसाठी चित्तथरारक प्रात्यक्षिके

वडाळा - वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, मुंबईतील उंच इमारती आणि झोपडपट्ट्यांतील अरुंद जागांमधून वाट काढत घटनास्थळी पोहोचण्याची कसरत अशा अनेक आव्हानांचा सामना आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना करावा लागतो. अशी आव्हाने पेलण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट अग्निशमन दलाचे जवान नेहमीच सज्ज असतातच. मात्र, अचानक लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवत नागरिकांनी आपली व इतरांची सुरक्षा कशी करावी, याचे मार्गदर्शन करण्यासाठी नागरी सुरक्षा विभाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने ६ ते १३ डिसेंबरदरम्यान ‘जागतिक नागरिक सुरक्षा’ आणि होमगार्ड सप्ताह कार्यक्रम राबविण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वडाळा पूर्वेतील बीपीटी नाडकर्णी पार्क जुनी वसाहतीतील मैदानात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवानांनी अग्निसुरक्षेबाबत चित्तथरारक प्रात्यक्षिके केली.

शॉर्टसर्किट, सिलिंडर गळती, कचरा जाळणे, ज्वलनशील पदार्थ आदी बाबींमुळे आग लागून जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो. अशा वेळी आपली व इतरांची सुरक्षा कशी करता येईल याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट अग्निशमन दलाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. वडाळा पूर्वेतील बीपीटी नाडकर्णी पार्क जुनी वसाहतीतील मैदानात नागरिकांना चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मरिन खातेप्रमुख एस. कोहली, सचिव आर. पी. पैबर, अग्निशमन अधिकारी आय. एस. चड्डा, कल्याण अधिकारी रुफी कुरेशी, सहायक व्यवस्थापक ए. आर. वाघमारे, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी मनोहर बेलेकर आदी प्रात्यक्षिकावेळी उपस्थित होते.

असा झाला थरार
प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी किराणा मालाची व कपड्यांची दुकाने तयार करण्यात आली होती. दुकानांना लागलेली आग तात्काळ आटोक्‍यात आणण्यासाठी काय करता येईल, याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्याचबरोबर इमारतीत अचानक लागलेली आग नियंत्रणात कशी आणावी, नागरिकांना सुरक्षित कसे बाहेर काढावे, इत्यादींचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com