अरुणाचल प्रदेश भवनला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

नवी मुंबई - वाशी रेल्वेस्थानक परिसरातील अरुणाचल प्रदेश भवनच्या इमारतीला सोमवारी दुपारी आग लागली. या इमारतीला काचेचे आवरण होते. त्यामुळे दहाव्या मजल्यावर लागलेली आग काही वेळातच चौदाव्या मजल्यावर पोहोचली. त्यामुळे गजबजलेल्या या भागत एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ती आटोक्‍यात आणली. ही आग सिगारेटमुळे लागली असावी, असा अंदाज अग्निशमनच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

वाशीबरोबरच नेरूळ, ऐरोली, पावणे व एमआयडीसीतील अग्निशमनच्या जवानांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. या आगीत वित्तहानी झाली असली तरी कोणीही जखमी झालेले नाही. अरुणाचल भवनच्या दहाव्या मजल्याला दुपारी आग लागली. त्यात इमारतीचा बाहेरचा भाग जळून खाक झाला. ही आग वरच्या मजल्यांवर झपाट्याने पसरत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमनच्या जवानांनी ब्रॅन्टो स्काय लिफ्ट या गाडीवरील यंत्रणेचा वापर करून ती आटोक्‍यात आली. ही आग लागली, तिथे वीजपुरवठा नव्हता. त्यामुळे सिगारेट पिऊन टाकल्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

Web Title: mumbai news fire washi railway station Fire Arunachal Pradesh Building