पहिली स्केटिंग रिंग नवी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली सेंट्रल पार्क येथे स्केटिंग रिंग तयार करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच स्केटिंग रिंग असल्यामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात त्यामुळे भर पडली आहे. तसेच या सुविधेमुळे शहरातील होतकरू खेळाडूंना स्केटिंगच्या सरावासाठी शहराबाहेर जावे लागणार नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई शहराने विविध क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंना सरावासाठी पालिकेने जागा आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध देण्यावर भर दिला आहे. आजच्या घडीला नवी मुंबई शहरात १० हजारांपेक्षा अधिक स्केटिंग खेळणारे खेळाडू असून राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू वास्तव्य करतात. मात्र स्केटिंग रिंगची सुविधा ठाणे जिल्ह्यात स्केटिंग रिंगची सुविधा नसल्यामुळे या खेळात करियर करण्याची इच्छा असलेल्या खेळाडूंना नियमित सरावासाठी पालघर जिल्ह्यातील विरार येथील अमेय स्पोर्टस क्‍लब येथे शुल्क भरून सरावासाठी जावे लागत होते. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना बंगळूरु येथे सरावासाठी जावे लागत होते. त्यामुळे खेळाडूंचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्ची होत होता. म्हणूनच नवी मुंबई महापालिकेने घणसोली येथील सेंट्रल पार्क येथे २०० मीटर लांबीची स्केटिंग रिंग तयार केली आहे. 

घणसोलीत बनविलेले हे स्केटिंग रिंग अत्याधुनिक आणि दर्जेदार आहे. या स्केटिंग रिंगमुळे शहरातील खळाडूंना सरावासाठी पालघर किंवा मुंबई जिल्ह्यात जावे लागणार नाही. तसेच या खेळाची आवड निर्माण होऊन यातूनच भविष्यातील  खेळाडू घडतील.
- मोहन डगावकर  (शहर अभियंता)

Web Title: mumbai news First Skating Ring in Navi Mumbai