मुंबई विद्यापीठाची एफएम सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली एफएम रडिओ सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. विद्यापीठाने 23 लाख रुपये खर्च करून एफएम रेडिओ सेवा सुरू केली होती.

मुंबई - मुंबई विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली एफएम रडिओ सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. विद्यापीठाने 23 लाख रुपये खर्च करून एफएम रेडिओ सेवा सुरू केली होती.

या सेवेवर दर वर्षी 12 लाख रुपये खर्च करण्यात येतो. सध्या ती पूर्णपणे बंद असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना विद्यापीठाने दिली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 8 फेब्रुवारी 2008 रोजी एफएम रेडिओचे उद्‌घाटन केले होते. त्यावेळीच रेडिओ स्टेशनसाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 22 लाख 80 हजार 798 रुपये वापरले गेले. ट्रान्समीटर नादुरुस्त असल्याने सेवा बंद असल्याचे उत्तर गलगली यांना देण्यात आले आहे.

Web Title: mumbai news fm service close in mumbai university