क्रिकेट माझा जीव की प्राण पण... : युवराज सिंग

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई: 'कॅन्सर' या जीवघेण्या आजारावर मात करीत फीनिक्स पक्ष्या प्रमाणे अग्निदिव्य पार करीत नवी उमेद, नव्या उत्साहाने नव्या जिद्दीने-जोशाने पुनश्च क्रिकेटच्या मैदानावर आपली बॅट तळपवित गोलंदाजांनी टाकलेल्या फास्ट बॉलिंगची पिसे काढ़ीत भारताला एकहाती सामने जिंकून देणाऱ्या युवराज सिंग याने आज (बुधवार) आपला तोच उत्साह फुटबॉल खेळताना दाखवित उपस्थित साऱ्यानांच अचंभित केले. क्रिकेटवर माझे प्रेम असून फुटबॉल खेळने हा माझा छंद आहे, असे मैदानावर फुटबॉलपटू लहान मुलींशी संवाद साधताना टीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंगने म्हटले आहे.

मर्सिडीझ बेंझ पुरस्कृत आणि नाझ फाउंडेशन, स्लम सॉसर, ऑस्कर आणि युवा या सामाजिक संस्थाना अर्थ सहाय्य करण्यास निवडण्यात आले असून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींना उत्तम शैक्षणिक सहायता प्राप्त करुन देणे त्याच बरोबर लॉरेन्स स्पोर्ट फॉर गुड़ द्वारे खेळाच्या ताकतीचा उपयोग जगातील तरुणांना हिंसा, भेदभाव आणि वंचित राहण्यापासून मुक्त होण्यासाठी केला जात आहे. संरक्षण, शिक्षण, पर्यावरण यांची जोपासना हे ध्येय आणि उत्तम समाज घडविणे हे लक्ष्य साधण्याचा लॉरेन्स स्पोर्ट फॉर गुड़ यांचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. सीईओ रोनाल्ड फॉल्गर यांनी संस्थेतर्फे युवराजला राजदूत म्हणून घोषित केले.

कुलाबा येथील कूपरेज फुटबॉल मैदानावर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन युवराज सिंगने फुटबॉलला किक मारून केले. त्याच बरोबर एका टीम कडून खेळत खेळाचा मनमुराद आनंद लुटला. फुटबॉल सामन्या नंतर खेळाडू मुलींशी संवाद साधतना विविध प्रश्नांचे फुलटॉस, बाउंसर सीमापार ठोकत सर्व प्रश्नांचा खेळाडू वृत्तीने सामना केला. तुम्हाला क्रिकेट आवडते की फुटबॉल या बाऊंसरवर थोडेसे सावरत युवराज म्हणाला की, क्रिकेटवर माझे प्रेम क्रिकेट हे माझे पॅशन आहे. क्रिकेटने मला नाव लौकिक मिळवून दिला असून, फुटबॉल खेळने मला आवडते. फुटबॉल हा माझा छंद आहे. तुमच्या पालकांनी तुम्हाला या खेळा बाबत कसे सहकार्य केले? या प्रश्नावर युवराज म्हणाला माझे डॅडी योगराज हे भारतासाठी क्रिकेट खेळले त्यांनी आणि आईने मला फार मदत केली. मला क्रिकेटसाठी फार मदत झाली, ती प्रॅक्टीस करताना तेथे योग्य मार्गदर्शक लागतो त्यासाठी वडिलांची, क्रिकेट कोच यांची बहुमोल मदत झाली.

क्रिकेट आणि अभ्यास यांचे संतुलन कसे साधलेत? यावर युवराज म्हणाला, आई बाबांचा रोख आधी शिक्षणावर होता. कठोर परिश्रम घेत अभ्यास केला. कोणतीही सूट अथवा सवलत नव्हती मला. नियमित शाळा प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आणि नंतरच क्रिकेटचा सराव वडील आणि कोच सर यांच्या सोबत करायचा, तोही त्याच मेहनतीने कोठेही आळस किंवा वेळकाढूपणा टाइमपास नव्हता. तुम्हाला मिळालेले सर्वांत प्रेशियस गिफ्ट कोणते? या मुलींच्या प्रश्नावर हृदयस्पर्शी उत्तर देताना युवराज म्हणाला, आज तुमच्यासह वेळ व्यतीत केला. फुटबॉल, बास्केट बॉल खेळलो, गप्पा मारल्या तुमच्यात मिसळलो. मला माझे बालपण आठवले आणि हेच माझ्यासाठी जगातील सर्वोत्तम प्रेशियस गिफ्ट आहे, असे म्हणताच मुलींनी एकच जल्लोष केला, युवराज ss युवराज.

Web Title: mumbai news football Cricket is my life: Yuvraj Singh