परदेशी नागरिकाला विमानतळावर अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई - "लुक आउट नोटीस' बजावलेल्या परदेशी नागरिकाला सोमवारी (ता. 29) सहार पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. अँथोडू वेलाईफ्या मुस्तासो असे त्याचे नाव आहे. अधिक तपासाकरता त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

मुस्तासो हा चीनचा रहिवासी आहे. फसवणूकप्रकरणी त्याच्या विरोधात गुजरातमध्ये गुन्हा दाखल आहे. तो परदेशात पळून जाणार असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याच्या विरोधात देशातील सर्व विमानतळावर लुक आउट नोटीस जारी केली होती. मुस्तासो हा गुजरातहून मुंबईला आला होता. तो काही दिवस मुंबईत राहिला. परदेशी जाण्याकरता सोमवारी विमानतळावर आला असता अधिकाऱ्यांनी त्याला पकडून सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. गुजरात पोलिसांना याबाबत कळवण्यात आले आहे. मुस्तासोला ट्रॉन्झिट रिमांडवर नेण्याकरता गुजरात पोलिसांनी न्यायालयात विनंती केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: mumbai news foreign person arrest on airport