चिमुकल्या रुग्णांचा किल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

दादर -  दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याचा आनंदही काही औरच असतो.  वाडिया रुग्णालयात दाखल असलेल्या लहान रुग्णांची यंदाची दिवाळी संस्मरणीय व्हावी म्हणून मंगळवारी (ता. १७) अनोखे सेलिब्रेशन झाले. रुग्णालय आवारातच मातीचा किल्ला बनविण्यात आला. तब्बल २०० हून अधिक मुलांनी सहभागी होऊन सुंदर किल्ला साकारला. विशेष म्हणजे कर्करोग पीडित मुलांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

आम्ही मुलांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. किल्ला बनवताना आणि मातीत खेळताना मुलांना जो आनंद मिळतो तो हल्ली दुर्मिळ झाला आहे. तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून आमचा तो प्रयत्न होता, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. ५ ते १४ वयोगटातील मुले किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली होती. मुलांनी प्रथमच रुग्णालयात अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांना रुग्णालयातर्फे भेटवस्तू आणि मिठाईही देण्यात आली.

माझ्या गावी दिवाळीत आम्ही किल्ला बनवतो. मी रुग्णालयात असल्याने यंदा किल्ला बनवता येणार नाही म्हणून मी खूप दुःखी होते. मात्र, रुग्णालयाने माझी किल्ला बनवण्याची इच्छा पूर्ण केली.
- साक्षी साळुंखे (रुग्ण)

Web Title: mumbai news fort kids