डोंबिवलीत रस्त्यावरच करावा लागतोय अंत्यविधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

खंबाळपाडा परिसराचा दिवसेंदिवस विकास होत असून याठिकाणी अनेक नव्या इमारती उभ्या राहत आहेत. तर केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या भाजपा पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागातच रस्त्यालगत अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने स्मार्ट सिटीच्या भुलथापांचे पितळ उघडे पडले आहे.

मुंबई - एकिकडे कल्याण-डोंबिवली शहरात स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगविली जात असताना या सांस्कृतिक नगरीत सुसज्ज अशी स्मशानभूमी नसल्याने रस्त्यालगतच उघड्यावर प्रेतांवर अंत्यविधी करण्याची नामुष्की नागरिकांवर ओढावली आहे. नवीन स्मशानभूमी बनविण्याबाबत केवळ कागदी घोडे नाचविले जात असून, स्थानिक नगरसेवकही यात कमी पडत असल्याची चर्चा रंगली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा प्रभागात मॉडेल रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आजही रस्त्यालगत अंत्यविधी केले जात आहे. ज्या ठिकाणी अंत्यविधी केले जात आहे, त्या ठिकाणी रस्त्या बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र, अंत्यविधीची जागा सोडून रस्त्याचे काम सुरू आहे. दिवगंत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी या समस्येकडे लक्ष दिले होते. पूर्वी हा रस्ता नव्हता मात्र या परिसराचा विकास झाला तेव्हा ही स्मशानभूमी उघड्यावर राहिल्याचे सांगितले होते. तर आता या प्रभागाचे नगरसेवक भाजपाचे साई शेलार आहेत. या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकाने पालिकेकडे पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे भाजपा पदाधिकारी राजू शेख यांनी सांगितले. तर स्थानिक नगरसेवक साई शेलार यांना याबाबत विचारणा केली असता  त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

खंबाळपाडा परिसराचा दिवसेंदिवस विकास होत असून याठिकाणी अनेक नव्या इमारती उभ्या राहत आहेत. तर केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या भाजपा पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागातच रस्त्यालगत अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने स्मार्ट सिटीच्या भुलथापांचे पितळ उघडे पडले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Web Title: Mumbai news funeral is on road at Dombivli