आदिशक्तिने केली दादर चौपाटी स्वच्छ (व्हिडिओ)

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सकाळ माध्यम आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांनी दादर चौपाटीवर राबवीली स्वच्छता मोहिम

मुंबईः मुंबईतील गणेशोत्सव ही एक अविस्मरणीय पर्वणी असते. दीड दिवसांच्या आणि काल झालेल्या गौरी गणेश विसर्जना नंतर आज (शुक्रवार) दुपारी सकाळ माध्यम (सकाळ माध्यमाचा प्लास्टिक मुक्ति आणि पर्यावरण संवर्धन उपक्रमास अनुसरुन) आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डचे CEO अतुल पाटणे यांनी दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबविली.

या स्वच्छता मोहिमेत सकाळ परिवारा बरोबरच मुंबई शहरातील काही महाविद्यालये देखील सहभागी झालेली पहावयास मिळाली. त्यांनी चौपाटी वरील कचरा गोळा करीत पिशव्यांमध्ये भरून गोळा करीत पालिकेच्या कचरा गाड्यात टाकला. पालिकेच्या जी उत्तर विभागाचे कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.

संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या कोमल घाग यांनीही हिरिरिने सहभाग घेतला. भर पावसात राबविलेल्या मोहिमेत तनिष्का महिला मंडळ, यीनचे स्वयंसेवक GLC कॉलेज चर्च गेट येथील विद्यार्थिनी रश्मिका सिंह तंवर, महिमा ठाकुर, पूर्णिमा वशिष्ठ, संग्राम जाधव, प्रतिष्ठा शुक्ला, मेघा सिंग, एलिस्टर सिक्वेरिया गवर्ननमेट लॉ कॉलेज आदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: mumbai news ganesh festival 2017 and Dadar Chowpatty Clean