डोंगरीच्या राजाचा प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबादेवी - गणेशोत्सवात ‘सकाळ’ राबवीत असलेल्या प्लास्टिकविरोधी लढ्याला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता शहरातील गणेशोत्सव मंडळेही या लढ्यात सहभागी होत आहेत. ‘डोंगरीचा राजा’, अशी ओळख असलेल्या चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश तोडणकर व कार्यकर्ते गणेशचरणी पुष्प वाहून प्लास्टिकचा भस्मासुर नष्ट करण्याचा संकल्प करत ‘सकाळ’च्या मोहिमेत सहभागी झाले. 

हे मंडळ ७९ व्या वर्षी पदार्पण करीत आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता पाद्यपूजन सोहळा झाला. त्या वेळी गणेशोत्सव मंडळाचे सभासद व कार्यकर्त्यांनी प्लास्टिकबंदीची शपथ घेतली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष नरेश तोडणकर, सचिव निशांत मांजरेकर, सहचिटणीस मनोज मानकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पाद्यपूजन सोहळ्याच्या वेळी वरुणराजाने लावलेल्या हजेरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला. भरपावसात कार्यकर्त्यांनी वाद्यकीर्ती आणि वारसा ढोल-ताशा पथकाच्या संगीताच्या ठेक्‍यावर थरकत त्यांनी जल्लोष केला. या वेळी मंडळाच्या सभासदाने समाजात जनजागृती व्हावी आणि प्लास्टिकचा भस्मासुर नष्ट व्हावा या ‘सकाळ’ माध्यमसमूहाच्या आवाहनास प्रतिसाद देत अनावश्‍यक प्लास्टिकच्या बंदीसाठी प्रयत्न करू, अशी शपथ गणेशचरणी पुष्प वाहून घेतली. 

प्लास्टिक हे पर्यावरणदृष्ट्या घातक आहे. प्लास्टिक जाळल्याने प्रदूषण होते आणि ऑक्‍सिजनची पातळी घसरते. प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांमुळे गटारे तुंबतात. त्यामुळे या वर्षापासून आम्ही प्लास्टिकचा भस्मासुर नष्ट करण्याचा संकल्प केला आहे.
- नरेश तोडणकर, डोंगरीचा राजा

Web Title: mumbai news ganesh mandal plastic mumbadevi