सायलेंट गरबो रमतो जाय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - दुर्गेच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेला नवरात्रोत्सव गुरुवार (ता. २१) पासून सुरू होत असून त्यासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या गरब्यावर पावसाचे सावट असले तरीही अनेक ठिकाणी होणाऱ्या सायलेंट दांडियाचे नावीन्य आहेच. मॉल वा मोठ्या हॉलमध्ये रंगणाऱ्या अशा गरब्यांना पावसाचा फटका बसणार नसल्याने उत्सवाचा जल्लोष होईल. 

अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी पूर्वीच आपल्या देवींच्या मूर्ती वाजतगाजत मंडपात आणल्या. लहान-मोठ्या मंडळांपासून फाल्गुनी पाठकसारख्या मोठ्या गरब्यांची मैदानांमधील व्यवस्था पूर्ण झाली असली तरी देवीबरोबरच वरुणराजाची कृपा आपल्यावर व्हावी, अशी प्रार्थनाच ते करत आहेत. अनेक मंडळांनी ऐनवेळी पाऊस आलाच तर पर्यायी व्यवस्था म्हणून बंद सभागृहात गरब्याची व्यवस्थाही केली आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून लाऊडस्पीकर न लावता गरबा खेळणाऱ्यांनी आपल्या कानांवर हेडफोन लावून त्यात ऐकू येणाऱ्या संगीतावर झुलायचा नवा ट्रेंडही यंदा आणला आहे. 

मंदिरे सजली
शहरातील महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, शीतलादेवी मंदिर, माटुंग्याचे मुरुगाई मंदिर आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अंबाबाईच्या देवळांमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवी मंदिराच्या मुख्य कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून त्यावर विश्‍वस्तांतर्फे जलाभिषेक केला जाईल. मुंबादेवी मंदिर पुढील नऊ दिवस पहाटे ५.३० पासून रात्री ११ पर्यंत भाविकांसाठी खुले राहील.

Web Title: mumbai news garba