नृत्याविष्कारातून सादर होणार गीतरामायण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबई - ग. दि. माडगूळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी गीतरामायणाचे एक पर्व उभे केले. आज इतक्‍या वर्षांनंतरही अनेकांच्या मनात गीतरामायण कोरले आहे. हेच गीतरामायणाचे पर्व नृत्याविष्कारातून पुन्हा एकदा रसिकांसमोर येणार आहे. रमेश देव प्रोडक्‍शन आणि सुबक यांच्या वतीने हे गीतरामायण सादर करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ३० सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजता षण्मुखानंद येथे हा नेत्रदीपक सोहळा होणार आहे.

गीतरामायणाने एका संपूर्ण पिढीवर गारूड केले. नव्या पिढीलाही हे गीतरामायण आपलेसे वाटते; मात्र आतापर्यंत गीतरामायण हे गायनामधून उलगडण्यात येत होते; मात्र आता पहिल्यांदाच ते नृत्याविष्कारातून पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांची आहे. 

कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकाराच्या आधारे सोनिया परचुरे आणि शरयू नृत्य कलामंदिराचे शिष्य हा कलाविष्कार सादर करणार आहेत; मात्र तो ध्वनिमुद्रित गीतरामायणावर नसून, अजित परब, हृषीकेश रानडे, विभावरी आपटे, शमिका भिडे हे गीतरामायण गाणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे; तर अतुल परचुरे यांचे खुमासदार सूत्रसंचालन असेल. नव्या पिढीला हा नवा आविष्कार निश्‍चितच आवडेल आणि पुन्हा एकदा गीतरामायणाचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: mumbai news Geetaramayana