घाटकोपर दुर्घटनेतील दोषींवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई महापालिका आणखी किती लोकांचे बळी घेणार ?

मुंबई: घाटकोपर येथील ‘साईदर्शन’ ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 निपराध लोकांचा बळी गेला असून, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज (बुधवार) विधानसभेत केली. नियम 97 अन्वये विरोधी पक्षांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते.

या दुर्घटनेला मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभारही जबाबदार आहे. ज्या इमारतीबाबत ही दुर्घटना घडली, त्या इमारतीचे महापालिकेने स्ट्रक्चर ऑडीट केले होते का? सदर इमारतीमधील तळमजल्याच्या नुतनीकरणासाठी महापालिकेने परवानगी दिली होती का? यासारखे प्रश्न उपस्थित होतात. सदर इमारतीच्या तळमजल्यात शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या सुनील शीतम याने नर्सिंग होम सुरु करण्यासाठी अनधिकृतपणे नुतनीकरण सुरु केले होते. हे नुतनीकरण करताना इमारतीचा मुख्य पिलर तोडण्यात आला, त्याबाबत स्थानिक रहिवाश्यांनी तक्रारही  केली होती. परंतु, सुनील शीतम याने या रहिवाशांना धमकावून गप्प केले.

शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे महापालिकेनेही त्याला अभय दिले होते, शेवटी ही इमारत खचून दुर्घटनाग्रस्त झाली. यामध्ये 17 निष्पाप लोकांचा बळी गेला. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उचापतींकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या कुटूंबियांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: mumbai news ghatkopar building ajit pawar vidhansabha