आर्किटेक्‍टच्या सहभागाची पोलिस करणार तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई -  घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरणात आर्किटेक्‍टचा कितपत सहभाग आहे, याची तपासणी पोलिस करत आहेत. याप्रकरणातील अटक आरोपी सुनील शीतप याच्या चौकशीत एका आर्किटेक्‍टचे नाव पोलिसांना समजले. दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत. 

सिद्धी साई इमारतीच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक एक, दोन आणि तीनमधील भिंती व इमारतीतील आरसीसी पिलर तोडून एकच मोठा हॉल बनवण्याचे काम करण्यात आले. त्यामुळेच ही इमारत पडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भिंत पाडून त्याजागी लोखंडी रॉडचा सपोर्ट देण्यात आला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. रंजित सांगळे नावाच्या आर्किटेक्‍टला नूतनीकरणाचे काम दिले होते, असे आरोपी शीतप याने चौकशीत सांगितले. पोलिस त्यासंदर्भात तपास करत आहेत. याकरता तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. इमारत दुर्घटनेतून बचावलेले लालचंद जेसाराम रामचंदानी (वय 67) यांच्या तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी शीतपच्या विरुद्ध मंगळवारी (ता. 25) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर त्याला अटक झाली. न्यायालयाने त्याला दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: mumbai news Ghatkopar building collapse

टॅग्स