आझाद नगरमधील शौचालयाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

घाटकोपर - पश्‍चिम विभागातील आझादनगर येथील सुलभ शौचालयाची दुरवस्था झाली आहे. भिंतींना वाळवी लागून सिमेंट निखळत असल्याने शौचालय कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे. नवीन दुमजली शौचालय बांधण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

दोन हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आझाद नगरमधील हे शौचालय १९९८ मध्ये बांधण्यात आले. या ठिकाणी पुरुषांसाठी २०; तर महिलांसाठी १४ आसनी शौचालय आहे. मात्र, लोकसंख्या वाढल्यामुळे सध्या ती अपुरी पडत आहेत. परिणामी शौचालयाबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात. 

पावसाळ्यात शौचालयाच्या भिंती पूर्णपणे झिरपत असून, सिमेंट निखळत आहे. शौचालयाभोवती कचरा साठत असल्याने दुर्गंधीमध्येच नागरिकांना प्रातर्विधी करावे लागतात. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

जीर्ण अवस्थेतील शौचालयासंबंधी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे या ठिकाणाची पाहणी केली असून, लवकरच नवीन दुमजली शौचालय बांधून देण्यासाठी प्रयत्न करीन. 
- सूर्यकांत गवळी, स्थानिक नगरसेवक

Web Title: mumbai news ghatkopar toilets

टॅग्स