माझ्या प्रियकरसोबत फिरतेस? फ्री-स्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

girls quarrel
girls quarrelsakal media

चेंबूर : मुंबई येथील पॅडर मार्गावर आपल्या पती बरोबर पर स्त्री कार मध्ये बसली असल्याने तसेच औरंगाबाद येथील एका महिलेने ही नुकतेच आपल्या पतीला परस्त्रीला सोबत फिरताना पाहताच पत्नीने गोधळ व मारहाण केल्याची घटना ताजी असताना विक्रोळी येथील सर्व्हिस रोडवर दोन तरुणींनी एका तरुणीला चोप दिल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. ही घटना घडत असताना उपस्थित काही तरुणांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलेली आहे. मुलीच्या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ काल पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mumbai news)

girls quarrel
आरोपी इकबाल अहमद कबीर अहमदला सशर्त जामिन मंजूर - हायकोर्ट

विक्रोळी येथील सर्व्हिस रोडवर शांतता असल्याने हा मार्ग संध्याकाळी प्रेमी युगालाचाअड्डा बनलेला आहे.आपल्या प्रियकरासोबत एक मुलगी फिरत असल्याचे कळताच विक्रोळी मध्ये राहणारी एका मुलींनी आपल्या मैत्रिणीला घेऊन या ठिकाणी येऊन आपल्या मित्रा सोबत या मार्गावर गाठले. माझ्या प्रियकरा सोबत फिरतेस? तुला बघतोच असा जाब विचारत तिला बेदम हाणामार करण्यास सुरुवात केली. तिच्या मैत्रिणी व तिने एकत्र मिळून एका मुलीला अक्षरशः रस्त्यावर लोळवनू तिला बेदम मारहाण केली. अखेर एका मैत्रिणींनी मध्यस्थी करुन तिची या दोन तरुणींकडून सुटका केली. या प्रकरणावर पडदा जरी पडला असला तरी काही तरुणांनी या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलवर शुट केला.सध्या विक्रोळीत हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com