"नी कॅप'मध्ये लपविलेले 22 किलो सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - हवाई गुप्तचर विभाग (एआययू) आणि सहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सोने तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत 22 किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सहा कोटी 37 लाख 50 हजार इतकी आहे. सोने तस्करीप्रकरणी "एआययू'ने दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

परदेशातील तस्कर हे सोन्याच्या तस्करीसाठी नवनवीन क्‍लृप्त्या शोधत असतात. कधी ट्रॉली बॅग; तर कधी स्वयंपाक घरातील साहित्याचा वापर होतो. आता तर वैद्यकीय साहित्यांचा वापर होऊ लागला आहे. रविवारी (ता. 11) "एआययू' आणि सहार पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार उघड झाला. केनियन एअरलाइन्सने सहार विमानतळावर आलेला एक प्रवासी मोठ्या प्रमाणात सोने घेऊन आल्याची माहिती मिळाल्याने "एआययू'ने सहार पोलिसांच्या मदतीने सहार परिसरातल्या हॉटेलमधून दोन जणांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान एक जण हा केनियन एअरलाइन्सचा कर्मचारी असल्याचे उघड झाले. अबदला अली असे त्याचे नाव आहे. सोने लपवण्याकरिता अबदलाने विशेष प्रकारची "नी कॅप' आणि जॅकेट तयार केले होते. त्यात सोने लपवून आणले होते. यंदाच्या वर्षातील ही एआययूची दुसरी मोठी कारवाई आहे.

Web Title: mumbai news gold seized