सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा - भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असून, त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम हाती घ्या, असे आदेश भाजपने पक्षकार्यकर्त्यांना दिले आहेत.

मुंबई - महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असून, त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम हाती घ्या, असे आदेश भाजपने पक्षकार्यकर्त्यांना दिले आहेत.

सरकारने अनेक निर्णय घेतले; पण त्यांची माहिती मात्र जनतेत योग्य त्या पद्धतीने पोहोचली नसल्याची खंत भाजपचे नेते व्यक्‍त करीत आहेत. कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने सरकारी योजनेचा प्रचार का करत नाहीत, असा प्रश्‍न पक्षसंघटनेला पडला आहे. तीन वर्षे उलटली तरी महामंडळांवरील नियुकत्यांचे प्रश्‍न मार्गी न लागल्याने आता कार्यकर्तेही नाराज आहेत. अशा परिस्थितीत ते सरकारच्या कामाचा प्रचार जनतेत कसा करतील, असा प्रश्‍नही केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व प्रवक्‍त्यांची बैठक घेतली. या बैठकीत सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी जनतेपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. प्रवक्‍ते आता लेखन, तसेच अन्य प्रचारकामांत सक्रिय झाले आहेत.

Web Title: mumbai news government decission go to public