इमारत रिकामी करण्याची सरकारची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

शिवसेनेच्या महापौरांचा भाजपवर उलटवार
मुंबई - भेंडी बाजारातील "हुसेनी' ही इमारत धोकादायक असल्याचे महापालिकेने 2013 मध्येच जाहीर केले होते. त्यानंतर इमारत रिकामी करण्याची जबाबदारी "म्हाडा'ची म्हणजेच राज्य सरकारची होती, असे सांगत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मुख्यमंत्र्यांनाच या घटनेला अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले आहे.

शिवसेनेने मुंबई बुडवल्याचा आरोप करून भाजपने शिवसेनेवर केलेल्या आरोपांना आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"हुसेनी' ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस "म्हाडा'ने 2011 मध्ये दिली होती. त्यानंतर महापालिकेनेही 2013 मध्ये ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही "म्हाडा'ने ही इमारत रिकामी केली नाही, असा आरोप आता केला जात आहे. महापौरांनीही हीच री ओढली. मंगळवारी उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, "उद्धटपणा न करता लोकांची माफी मागा', असा टोला लगावला होता. त्याला शिवसेनेकडून कोणतेही जाहीर उत्तर देण्यात आले नाही. मात्र, आज उपकरप्राप्त इमारत पडल्यावर बॅकफूटवर असलेली शिवसेना फ्रंटफूटवर आली.

मुंबादेवी येथील कॉंग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी महापौरांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही. "आता आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही, तर संकटात अडकलेल्यांना वाचविण्याची प्राथमिकता आहे,' अशा शब्दांत त्यांनी महापौरांचे कान टोचले.

Web Title: mumbai news government responsibility to empty the building