लोकल अंगावरुन जाऊनही बचावली तरूणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

अंधेरी रेलवे स्टेशनमधे आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई- लोकल अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र, गेल्या शनिवारी अंधेरी रेलवे स्टेशनमधे एका 22 वर्षीय तरूणीने स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे.

तणावाखाली असणाऱ्या या तरुणीने अगोदर मोबाईलवरून मित्राशी सवांद साधला होता. संवाद झाल्यानंतर तिने येणाऱ्या लोकलसमोर स्वतःहाला झोकून दिले. तरूणींने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसताच स्टेशनमध्ये आलेल्या लोकलच्या मोटरमनने लोकलचा वेग आणखी कमी करून ती थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरूणीच्या शरीरावरून लोकलचे तीन डबे गेले होते.

लोकल थांबल्यानंतर रेल्वे पोलिस, प्रवाशांच्या मदतीने तिला बाहेर काढून जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तिच्या पाठीला, हाताला आणी पोटाला किरकोळ मार लागला आहे. याबाबत रेल्वे पोलिस पुढील तपास करत आहे.

Web Title: mumbai news gril trying to suicide local railway