गुजरात फेस्टिव्हलमध्ये साहित्य संमेलनावर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी साहित्य, मराठी संमेलन, बडोद्याने दिलेले साहित्यिक अशा विविध विषयांवर गुजरात लिटरेचर फेस्टिव्हलच्या निमित्ताने चर्चा रंगली. पुढील आठवड्यात होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात गुजराती साहित्यिकांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.

बडोदे येथे नुकत्याच झालेल्या गुजरात लिटरेचर फेस्टिव्हलनिमित्ताने गुजराती साहित्याबरोबर पहिल्यांदाच मराठी साहित्यावर चर्चा रंगली. या संमेलनमाच्या निमित्ताने ज्येष्ठ लेखक मधुकर प्रधान, कवी प्रसाद देशपांडे, निवृत्त मराठीच्या प्राध्यापिका डॉ. विनिता ठाकूर, संजय बच्छाव हे उपस्थित होते. यानिमित्ताने बडोदे स्वातंत्र्यपूर्व काळातील साहित्यिक, वाङ्‌मय परिषदेचे कार्य, आताचे साहित्यिक, स्वातंत्र्यानंतरची वाङ्‌मयीन चळवळ अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा रंगली.

Web Title: mumbai news gujrat festival sahitya sammelan