दहावीत दिव्यांग विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नियमित शाळेत शिक्षण घेऊन मिळविले भरघोस गुण
मुंबई - नियमित मुलांसोबत सामान्य शाळेत शिक्षण घेतलेल्या याज्ञिक वेदक या अंध विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळाले आहेत. त्याचे हे यश सामान्य मुलांसाठी निश्‍चितच डोळ्यात अंजन घालणारे आहे.

नियमित शाळेत शिक्षण घेऊन मिळविले भरघोस गुण
मुंबई - नियमित मुलांसोबत सामान्य शाळेत शिक्षण घेतलेल्या याज्ञिक वेदक या अंध विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळाले आहेत. त्याचे हे यश सामान्य मुलांसाठी निश्‍चितच डोळ्यात अंजन घालणारे आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड, इंडिया या संस्थेमार्फत एकात्मिक शिक्षण योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील अंध विद्यार्थी सामान्य मुलांसोबत शिक्षण घेतात. 2016-17 या वर्षी एसएससी बोर्डाच्या नियमित परीक्षेसाठी 14; तर सीबीएससी बोर्डाच्या दोन विद्यार्थ्यांसह 17 नंबरचा अर्ज भरून 23 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

अंध विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयात सवलत मिळते. या 23 विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थ्यांनी ही सवलत नाकारली होती. सामान्य मुलांप्रमाणेच त्यांनी गणित विज्ञान या विषयांची परीक्षा दिली. यात यश दिवे या विद्यार्थ्याला गणितात 95; तर विज्ञानमध्ये 83 गुण मिळाले आहेत. एसएससीप्रमाणेच सीबीएससी बोर्डाच्या नियमित परीक्षेला बसून अंध विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. काव्य हरी या विद्यार्थिनीला 94.2 टक्‍के; तर सुरेश सावलेला 82 टक्के गुण मिळाले आहेत. 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसलेल्या मयांक सावरियाला या अंध व शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्याला 84 टक्के गुण मिळाले आहेत. याच खासगी विद्यार्थ्यामध्ये बहिरांध असलेल्या गौरव सिंहला 65 टक्के गुण मिळाले आहेत. विलेपार्ले आणि मुलुंड येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरांत या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. नॅब संस्थेकडून या शैक्षणिक साहित्य पुरविले जात होते.

Web Title: mumbai news handicaped student success in ssc