ओव्हरहेड वायरमुळे "हार्बर'चा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - पनवेल स्थानकात "सीएसटी'च्या दिशेला ओव्हरहेड वायरमध्ये गुरुवारी सकाळी 6.10 वाजता बिघाड झाला. यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. सकाळी 10 पर्यंत लोकल उशिरा धावत होत्या.

मुंबई - पनवेल स्थानकात "सीएसटी'च्या दिशेला ओव्हरहेड वायरमध्ये गुरुवारी सकाळी 6.10 वाजता बिघाड झाला. यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. सकाळी 10 पर्यंत लोकल उशिरा धावत होत्या.

पनवेल स्थानकातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वर ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे "सीएसटी'च्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळित झाली. त्यामुळे "सीएसटी'च्या दिशेने जाणाऱ्या लोकल फलाट क्रमांक एक आणि दोनवरून सोडण्यात आल्या. दुरुस्तीसाठी 40 मिनिटे लागली. त्यानंतर पुन्हा फलाट क्रमांक 3 आणि 4 वरून लोकल सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्यास चार तास लागले. लोकलच्या 11 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेने 26 लोकल उशिरा धावल्याची माहिती दिली.

Web Title: mumbai news harbour line close by overhead wire problem