तेजस एक्‍स्प्रेसमध्ये 20 रुपयांत हेडफोन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - अत्याधुनिक सुविधांनी आणि सुपरफास्ट अशा "तेजस' एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांना 20 रुपयांत हेडफोन देण्याचा निर्णय "आयआरसीटीसी'ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) घेतला आहे.

मुंबई - अत्याधुनिक सुविधांनी आणि सुपरफास्ट अशा "तेजस' एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांना 20 रुपयांत हेडफोन देण्याचा निर्णय "आयआरसीटीसी'ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) घेतला आहे.

सीएसटी ते करमाळी तेजस सुपरफास्ट एक्‍स्प्रेस साडेआठ तासांत अंतर कापते. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी आसनांबरोबरच अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. प्रत्येक आसनांमागे एलईडीला हेडफोनही जोडले आहेत. या गाडीची सीएसटी ते करमाळी अशी पहिली फेरी पार पडल्यानंतर ट्रेनमधील काही डब्यांतील असणारे हेडफोनच जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. रेल्वेकडून प्रत्येक आसनामागे संपूर्ण हेडसेटच देण्यात आला होता आणि त्यातील प्रत्येकाची किंमत ही 200 रुपये एवढी होती. याचबरोबर एका प्रवाशाने हेडफोन वापरल्यानंतर काही प्रवाशांकडून तेच हेडफोन वापरण्यास नकार देण्यात आल्यानंतर यावर तोडगा काढत आता "आयआरसीटीसी'ने 20 रुपयांत हेडफोन विकण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यापासून ही सुविधा देण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: mumbai news headphone in tejas express

टॅग्स