मुंबईतून प्रथमच हृदय अन्य राज्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - अवयवदानात महाराष्ट्राने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईत झालेल्या अवयवदानातील हृदय पहिल्यांदाच राज्याबाहेर पाठवण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी हे हृदय चेन्नईला पाठवण्यात आले. 

मुंबई - अवयवदानात महाराष्ट्राने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईत झालेल्या अवयवदानातील हृदय पहिल्यांदाच राज्याबाहेर पाठवण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी हे हृदय चेन्नईला पाठवण्यात आले. 

अपोलो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 43 वर्षांच्या पुरुषाचा मेंदू मृत (ब्रेनडेड) घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. सर्व अवयव दान करण्याची परवानगी कुटुंबीयांनी दिली होती. इतर अवयव सक्षम नसल्याने हृदय दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत योग्य रुग्ण नसल्याने "नॅशनल ऑर्गन ऍण्ड टिश्‍यू ट्रान्सप्लान्ट' समितीच्या मध्यस्थीने चेन्नई येथील रुग्णाला हृदय देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

गुरुवारी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी ग्रीन कॉरिडोर करून हे हृदय 1 वाजून 28 मिनिटांनी मुंबई विमानतळावर आले. तेथून ते चेन्नईतील फोर्टीस रुग्णालयामधील रुग्णासाठी हृदय नेण्यात आले. 

यापूर्वी सुरत येथून हृदय मुंबईत आणण्यात आले होते. 2016 मध्ये औरंगाबादेत झालेल्या अवयवदानावेळी दान करण्यात आलेले हृदय चेन्नईला पाठवण्यात अपयश आले होते. विमान न मिळाल्याने ते हृदय चेन्नईला पाठवता आले नव्हते.

Web Title: mumbai news heart