पावसाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

मुंबई - पाहुण्यांप्रमाणे हजेरी लावून निघून जाणाऱ्या पावसाने रविवारी शहराला चांगलेच झोडपून काढले. शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाल्याने नालेसफाईचा पालिकेचा दावा फोल ठरला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करताना दिसत होते. पालिकेने अनेक ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला. तर स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या विभागात परिस्थितीचा आढावा घेतला.

बोरिवली - विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटाच्या साथीने शनिवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना सुखद धक्का दिला. बोरिवली गोराई, एक्‍सर रोड, देवीपाडा, कार्टर रोड, दहिसरच्या ओवरी पाडा, आनंदनगर, रावळपाडा, म्हात्रे वाडी, गणेशनगर आदी भागांत पावसाचे पाणी तुंबले होते. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिल्याने नागरिकांनी रविवारी सुटीचा दिवस पावसात भिजत मनसोक्त आनंद लुटला. 

काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या ऊन पावसाच्या खेळाने लोकांच्या आशेवर सतत पाणी फिरत होते. काही मिनिटे पडून त्यानंतर जाणवणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. १४ जूनला रात्री पावसाने अशीच धडाक्‍यात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गायब झाला तो शनिवारी रात्रीच प्रगट झाला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. पालिकेच्या नालेसफाई कामाचे पितळ आजही उघडे पडल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.

Web Title: mumbai news heavy rain

टॅग्स